| Date: 2025-12-06

आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी भांडवलकर तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. मिलिंद गजभिये, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सचिन वानखेडे, रा.से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा शशिकांत राठोड सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक गण, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ' भारतीय संविधानाचे महत्त्व' या विषयावर प्रा. डॉ. मिलिंद गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.