Place: यवतमाळ | Date: 2025-03-26

अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथे शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ मध्ये कला, वाणिज्य, व विज्ञान शाखांमधून पदवी व पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सी. ए.प्रकाशजी चोपडा, तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री शुभाषजी शर्मा, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य, डॉ भांडवलकर यांनी केले. पद्मश्री शुभाषजी शर्मा यांनी शेंद्रीय शेतीचे महत्व, पर्यावरणाचा समतोल राखने किती महत्वाचे आहे आणि भविष्यातील भारतीय शेतीची दशा व दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी,परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचे आयुष्य घडवावे, उत्तम व्यक्तिमत्व विकास घडवून देशाच्या व समाजाच्या प्रगतीस हातभार करावा असा कानमंत्र अध्यक्षीय भाषणातून प्रकाशजी चोपडा यांनी दिला. या समारंभाला अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे समन्वयक डॉ, पी. पी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. सी. जाधव, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.सुनीता गुप्ता, डॉ. प्रशांत मुस्कावार, श्री. प्रशांत गावंडे, विध्यार्थी , पालक ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा अनघा अनमोड, प्रा, शशिकांत राठोड, डॉ ओंकार कापसे,श्री अनिल गोठे,श्री शरद आडे, श्री शरद लिहितकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.