News-Details

अमोलकचंद महाविद्यालयात सायन्स क्लब

Place: यवतमाळ | Date: 2026-09-30


येथील अमोलकचंद महाविद्यालयात विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या शिक्षण प्रणाली संकल्पनेतून विज्ञान शाखेतर्फे 'सायन्स क्लब'ची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड होते.विज्ञान क्लबच्या माध्यमातून यवतमाळ शहरातील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, अँग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ पब्लिक स्कूल, वीणादेवी दर्डा शाळा, अणे विद्यालय, विवेकानंद विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत विज्ञान विषयाचे ज्ञान दिले जाणार आहे. विज्ञान विषयाची तंत्रज्ञानासोबत सांगड घालण्यासाठी जेडीआयईटीची मदत घेतली जाईल. सायन्स क्लब प्रदर्शन, स्पर्धा, तज्ज्ञांची व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यामधील सर्जनशीलता, सांघिक कार्य आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी 'स्कूल कनेक्ट' उपक्रम एक व्यासपीठ ठरेल, असे यावेळी सांगण्यात आले.महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्य कौशल्य व रोजगार प्राप्तीसाठ प्रिइंक्युबेशन सेंटर स्थापनेची घोषण करण्यात आली. त्याचे समन्वयक डॉ अश्विन अतकुलवार यांचे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आनंद काकडे यांनी विज्ञान क्लबची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट‍ केली.कार्यक्रमाला एस. एस. राठोड, अमित राजकुंटवार तसेच विज्ञान विभाग सत्र प्रमुख डॉ. प्रवीण जोशी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. माधुरी भादे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्रा. यशवंत खंदारे यांनी तर आभार प्रा. डॉ. अनघा अनमोड यांनी मानले.