Place: यवतमाळ | Date: 2026-09-28

विद्या प्रसारक मंडळद्वारा संचालित, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळयेथील राज्यशास्त्र विभाग, इतिहास विभाग, हिंदी विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासमंडळउद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाडव कार्यक्रमाचे उद्घाटकवप्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रवीण शुक्ला, श्री. इक्बाल साहिल, इंग्लिश विभाग प्रमुख डॉ. गणेश खंडेराव, मराठी विभाग प्रमुख डॉ. किशोरबुटले, इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुलोचना लांजेवार, हिंदी विभाग प्रमुख डॉ. सरिता सिंधी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सचिन वानखेडे मंचावर उपस्थित होते. सर्व प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या गीताने झाली. उद्घाटक व प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रवीण शुक्ला यांनी भारतीय संविधानात हिंदी व मराठी भाषेची तरतूद व ऐतिहासिक पाश्र्वभूमी या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय संविधानात विविध भाषांना मिळालेले स्थान, विशेषतः हिंदी व मराठी भाषेविषयी करण्यात आलेल्या संवैधानिक तरतुदी आणि त्यामागील ऐतिहासिक पाश्र्वभूमी उलगडून दाखवली. देशाची एकात्मता आणि सांस्कृतिक जडणघडणीत भाषांचे योगदान अनमोल असल्याचे सांगितले. तसेच हिंदी कविता व श्लोक सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजनात्मक वातावरण निर्माण केले. तसेच श्री. इक्बाल साहिल यांनी हिंदी कवितेच्या माध्यमातून भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अजय लाड यांनी राजभाषा हिंदी आणि मातृभाषा मराठी भाषेची भारतीय संविधानात केलेली तरतूद ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. भाषेचे अधिक ज्ञान असणे, हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोलाचे असते अशा शब्दात विद्याथ्र्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी अभ्यास मंडळात असणारूया सदस्याचे, विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत व अभिनंदनकरण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र, इतिहास, हिंदी व मराठी विभागातील प्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख किशोर बुटले, तर कार्यक्रमाचे संचालन हिंदी विभाग प्रमुख सरिता सिंधी यांनी केले व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सचिन वानखेडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.