Place: यवतमाळ | Date: 2026-10-27

विद्या प्रसारक मंडळाद्वारा संचलित यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मुलींच्या हॉकी संघात निवड झाली आहे. कु. जान्हवी राऊत, कु. कल्याणी चाणेकर आणि कु. गायत्री पुरी या तिन विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडागुणांच्या बळावर विद्यापीठाच्या संघात स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही विद्यार्थिनींची विद्यापीठ हॉकी संघात सलग दुसन्यांदा निवड झाली आहे. राजस्थानमधील जयपूर विद्यापीठ येथे दिनांक २ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हॉकी संधाचे प्रशिक्षण शिबिर दिनांक २१ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाचा हॉकी संघ दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथून स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. विद्यापीठ संघात निवड झालेल्याअमोलकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी
कु. जान्हवी राऊत, कु. कल्याणी चाणेकर, कु. गायत्री पुरी अमोलकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ संघात सलग दुसन्यांदा स्थान मिळवल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ. विजय बाबू दर्डा, सचिव सी.ए. प्रकाशजी चोपडा, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचान्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.