Place: यवतमाळ | Date: 2026-09-25

क्रीडा व सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हास्तरीय विविध स्पर्धा २२ व २३ सप्टेंबर दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत अमोलकचंद महाविद्यालयातील खेळाडूंनी वर्चस्व राखले. स्पर्धेतील खेळाडूंची निवड विभागीय व राज्यस्तरीयसाठी झाली. रायफल व पिस्तूल२ खेळाडूंची राज्यस्तरीयसाठी निवड झाली शूटिंगमध्ये स्मीत वांद्रेकर, अनिरुद्ध शिवपुरीया, मयंक लेवस्कर, सुमित पाटील, संजीव पाटील, महंमद ताहीर तंवर, गौरी वांद्रेकर, प्रिया भुरे, वैष्णवी केसकर यांनी आपापल्या इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विभाग स्तरासाठी निवड निश्चित केली. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हर्षिता कुचेरिया द्वितीय क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरासाठी, जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विभाग स्तरासाठी निवड निश्चित केली. विभागीय स्तरावर रग्बी या खेळात सेलेक्शन ट्रायल सुमित पाटील, संजीव पाटील या दोन खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड झाली. खेळाडूंचे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, सचिव सीएं प्रकाश चोपडा, कार्यकारिणी सदस्यांनी कौतुक केले. खेळाडूंना प्राचार्य डॉ. अजय लाड, उपप्राचार्य व्ही. सी. जाधव, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.