Place: यवतमाळ | Date: 2026-09-23

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, वुशू असोसिएशन ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा २०२६-२७ घेण्यात आल्या. यामध्ये येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. १९ वर्षाखालील मुलांमध्ये ९० किलो खालील वजनगटात येथील अमोलकचंद महाविद्यालयातील खेळाडू आदर्श प्रदीप जाधव याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. तो छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत अमरावती विभागाचे नेतृत्व करणार आहे. तसेच रिधिमा देशमुख हिने यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व करताना ६५ किलो खालील वजनगटात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले. या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड आदी उपस्थित होते. या दोन्ही खेळाडूंचे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा, सचिव चार्टर्ड अकाऊंटंट प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉ. अजय लाड आदींनी कौतुक केले.